Quantcast
Channel: तंत्रज्ञान » wikipedia

Open Source Software हे आहे तरी काय ?

0
0

नमस्कार मंडळी ,

Open source describes practices in production and development that promote access to the end product’s source materials  –  Wikipedia
Open source ( खुली साधने)  म्हणजे उत्पादन व विकासातील अशी प्रक्रिया ज्याने आपण पुर्ण झालेल्या उत्पादनातील घटकांना मिळवू शकतो .

म्हणजे ?

आपण जे काही तयार वा लिहिले आहे ,ते कोणीलाही मुक्तपणे वापरता येणे. open source हे फ़ार लोकप्रिय साधन आहे.त्याला जगात वेगवेगळे लोक वेगवेगळे नाव वापरतात. Open source ची सुरुवात कुठे व कशी झाली हे सांगणे कठिणच आहे.परंतु चारचाकी च्या अधिकारांवरुन भांडणे झाली व मुक्त साधने याचा प्रचार झाला. Open source हे फ़ार मोठ्या क्षेत्रात पसरलं आहे. ते तंत्रज्ञान ,शेती ,समाज , राजकारण ,अर्थाशास्त्र ,शिक्षण इंथपासुन ते कला ,नवसंशोधन , ओषधी क्षेत्र इ. पर्यान्त पसरले आहे.


या सर्वावर लिहणे शक्य नाही. तो या लेखाचा उद्देशही नाही. आपण यातील फ़क्त Open Source Software याचा विचार करु.
Open source software (OSS) म्हणजे असे software ज्याचा आपण फ़क्त उपयोगच नाही तर, त्यात बदल घडवणे , बदविलेले software चा प्रचार करणे इ. येत. OSS  ला Free software moment या सामाजिक चळवळीमुळे चालना मिळाली. Free software चळवळ १९८३ मधे Richard Stallman यांच्या पुढाकाराने सुरु झाली. या चळवळतूनच “open source”,”software libre”  या शब्दाचा उगम झाला.

Richard Stallman

Richard Stallman यांनी आताची लोकप्रीय GNU Project  ची स्थापना केली. GNU Project  प्रोजेक्ट मधुनच  GNU operationg system ची सुरुवात झाली.यातूनच GNU OS जन्माला आली.  FOSS ( Free and Open source Software ) हा शब्द आता internet  वर वांरवार वापरला जातो.याचा अर्थ जे software आहे ते मुक्त व खुले दोन्ही आहे.

“भारत सरकारने  C-DAC Chennai and Anna University, Chennai द्वारा संचालित FOSS साधन केन्द उभे केले आहे. त्याची एक Node (टप्पा)  VJTI College,Mumbai  येथे आहे .”

फ़रक -

Free software व Open Software हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. काही  FreeSoftware च्या अटी   OpenSoftware मान्य करत नाही तर OpenSoftware काही च्या अटी FreeSoftware  मान्य करत नाही.

” जवळजवळ सर्व OpenSoftware हे मुक्त आहे व सर्व FreeSoftware हे खुले आहेत.”
-Free Software Foundation

(माहिती पाहण्यासाठी  icon  वर  click  करा.)

गरज-

सुरवातीला software हे मुक्त होते. लोक तस्याप्रकारे काम करत. पण, IBM, Microsoft इ. कंपन्यामुळे जे मुक्त software होते ते विकले जावू लागले. प्रत्येकाला तेच software तेवढ्याच किंमतीला घ्यावे लागत. त्यातूनच ही चळवळ उभी राहिली. ती आता भारतात ही पोचली आहे. महाराष्ट्र शासनाने Microsoft सोबत केलेल्या कराराविरोधात free software foundation of india लढा लढत आहे.

काही लोकप्रिय Open Source –

http://en.wikipedia.org/wiki/List_of_free_and_open_source_software_packages

काही उपयुक्त Softwares -

१. इंटरनेट पाहण्यासाठी सुरक्षित Browser .

Mozilla FireFox -

हे Browser मराठीतही उपलब्ध आहे. येथे जा.
http://www.mozilla.com/en-US/firefox/all.html

२. व्हिडियो बघण्यासाठी फ़ार उत्तम आहेत. .
VLC Player

Media Player Classic

३. open-source office याचा उपयोग आपण रिपोर्ट word processing, spreadsheets, presentations, graphics, databases  इं साठी करु शकता.

४. Operating system download.

५.ग्राफ़िक्स/फ़ोटो संपादनासाठी -
अ.  Photos.                                                                                                                           

ब. Graphics.

६. E-mail

७.3D Graphics and Modeling

आपल्याला हा लेख कसा वाटला हे जरुर कळवा. सुचना असतील त्या बिनधास्त लिहा.

- तर्फ़े तंत्रज्ञ (अक्षय)


Tagged: मराठी, मुक्त साधने, FOSS, mozilla, Open source. free software, OSS, wikipedia


तुम्ही Wikipedia बद्दल खरच जाणता !

0
0

नमस्कार मंडळी,

नवीन इंग्रजी वर्षाच्या हार्दिक शुभेच्या !! आजच्या जगात ज्ञान हेच धन आहे. आज ज्याच्या जवळ जास्त माहिती तो जास्त सुरक्षित आहे. त्याच मुळे आज ज्ञानाची किंमतही वाढली आहे. जसे की, कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घ्या किंवा कोणतेही पुस्तक घ्या, ते फ़ारच महाग झाले आहे. बरेचदा महागाईमुळे आपल्याला आपल्या ज्ञानाच्या भुकेला मुरड घालावी लागते.


जर हे सर्व ज्ञान मोफ़त उपलब्ध झाल्यास किती छान होईल. असाच विचार  ’जिमी वेल्स’ यांनी केला व त्यावर कृती सुध्दा केली. त्यातूनच Wikipedia चा जन्म झाला. ज्ञानाचे अपरिमीत भंडार लोकांसाठी खुले झाले, ते पण मोफ़त. आपल्या पेकी बरेच लोकांना याबद्दल माहीती असेल पण Wikipedia बरोबरच Wikimedia या समुहाचे अजुन अनेक प्रकल्प आहेत. ते सुध्दा अनेक भाषेतुन उपलब्ध आहेत. हे सर्व मराठीत सुध्दा उपलब्ध आहे. त्याच बद्दल आपण जाणून घेवू.

विकिपिडीया हा प्रकल्पाचा उद्दिष्ट जगातील सर्व भाषेत ज्ञानकोष तयार करणे हा होय. विकिपिडियाचा जन्म १ जानेवारि २००१ ला झाला. आता यात २७३ विविध भाषेत १ करोडच्या वर लेख आहे. यात सर्वात समोर इंगजी भाषा आहे. मराठीत आता ३२,२५६ विविध विषायावरिल लेख आहे व ते वाढत आहेत.
याच प्रमाणे विकिपिडियाचे अनेक प्रकल्प आहेत ते आपण एकेक करुन पाहू.

१. Wikipedia – मुक्त ज्ञानकोश

ह्या प्रकल्पात विविध विषयावर लेख लिहिले आहे. हे लेख मायाजाळावरिल स्वयंसेवक लिहितात. आपल्याला जर संगणक विषयी, नायजेरिया बद्दल किंवा भारताचा इतिहास जाणायचा असेल तर येथे सर्व उपलब्ध आहे. हि माहिती मराठीतही उपलब्ध आहे.
दुवा –  http://en.wikipedia.org
मराठी विकिपिडियाला भेट देण्यासाठी –  http://mr.wikipedia.org

२. Wiktionary – शब्दकोश

ह्या प्रकल्पात विविध भाषी मोफ़त शब्दकोश प्रत्येक भाषेत तयार करायचा आहे. याचा अर्थ एका भाषेचा उपयोग करुन सर्व भाषेतील सर्व शब्दाची व्याख्या करने. या प्रकल्पाची सुरुवात दिसेंबर २०२० ला झाली. आतापर्यंत यात १५० विविध भाषेत ३० लाख शब्द साठा आहे.दुवा – http://en.wiktionary.org
मराठीतील प्रकल्प  दुवा –  http://mr.wiktionary.org

मराठीतील लेख लिहिण्यासाठी आपण मराठी विकिपिडियावर जावे व मराठीतील लेखांची संख्या वाढवावी.

३. Wikiquote  – अवतरणे

यात विविध प्रसिध्द लोकांचे, पुस्तकातील वा चित्रपटातील अवतरणे घेतली आहे. यात म्हणी , वाक्यप्रचार, घोषणा इ चा समावेश आहे. याची सुरुवात जुले २००३ मध्ये झाली. दुवा –   http://en.wikiquote.org/wiki/Main_Page
मराठीतील प्रकल्प दुवा –  http://mr.wikiquote.org

४. Wikibooks  – ग्रंथसंपदा

या प्रकल्पात मोफ़त इ-पुस्तके, विविध भाषा अभ्यासक्रम इ. चा साठा तयार करणे. याच मुख्य उद्देशः विद्यार्थाना व शिक्षाकांना स्वसाहायता व्हावी याकरीता. येथे  विविध पुस्तके मिळू शकतात.
याचा दुवा – http://en.wikibooks.org/

५. Wikisource – स्त्रोतपत्रे

हा विविध भाषेतील प्रकल्प नोव्हेंबर २००३ ला मोफ़त व उपलब्ध असलेले कागदे जमा करण्यासाठी सुरु झाला. यामुळे आता महत्वाचे अनेक कामे जसे की कोणत्याही देशाचे संविधान इ गोष्टी साठवून ठेवता येतात व त्याचे भाषांतर सुद्धा करता येते. यात आता पर्यंत ८.८ लाख विविध कागदे जमा झाली आहे. येथेच मला भारतीय संविधान भेटले.
याचा दुवा –  http://en.wikisource.org/

६.  Wikiversity  –  विद्यापीठ

हा प्रकल्प माहिती, शिकण्यारे समूह सोबतच संशोधन करण्यासाठी वाहिलेले आहे. याची सुरुवात १५ ऑगष्ट २००६ ला झाली.  हा फ़ार महत्व पुर्ण प्रकल्प आहे. हा फ़क्त विश्वविद्यालया संबधीतच नाही तर कोणत्याहि पातळीवरिल विद्यार्थास मदत होइल असे आहे. यात २०१० पर्यत ३०,००० प्रवेश आहेत.
याचा दुवा –  http://en.wikiversity.org/wiki/Wikiversity:Main_Page

७. Wikimedia Commons- सामायिक भंडार

या प्रकल्पात मोफ़त छायाचित्रे, नकाशे , व्हिडिओज, अ‍ॅनिमेशन इ चा समावेश आहे. याची सुरुवात सप्टेंबर २००४ ला झाली.
याचा दुवा –  http://commons.wikimedia.org/

८. Wikispecies  –  प्रजातीकोश

या प्रकल्पात विविध सजीव प्राण्यांबद्दल माहिती भेटेते. याची सुरुवार १४ सप्टेंबर २००४ ला झाली. हा प्रकल्प खास करुन वेज्ञानिक गोष्टी साठी आहे. यात २०१० पर्यंत २४ लाख लेख आहेत.
याचा दुवा –  http://species.wikimedia.org/

याच बरोबर खालील काही प्रकल्प आहे.

९. Wikinews – बातम्या

यात विविध बातम्या लिहिता येतात. याचे मुख्य काम म्हणजे बातमीची खात्री करणे व विश्वासह्रायता तपासणे हे होय.
दुवा –  http://en.wikinews.org/wiki/Main_Page

१०. Media Wiki

हे एक सॉफ़्ट्वेअर आहे. जे की सर्व Wikimedia समुह व इतर संकेतस्थळे वापरतात.
दुवा-  http://meta.wikimedia.org

याच प्रमाणे अनेक प्रकल्प wiki-  वा  -pedia या नावाने सुरु आहेत. पण वरिल १० प्रकल्प सोडुन कोणताही प्रकल्प  Wikimedia  या समूहाचा नाही. त्याच प्रमाणे Wikimedia वरिल सर्व माहिती वाचनासाठी व वापरण्यासाठी मोफ़त आहे.

याच वर्षी विकिपिडियाला १० वर्षे पुर्ण झाली. आता विकिपिडिया भारतातकडे खास लक्ष देणार आहे. त्यासाठी त्यांनी भारतीय भाषेचा प्रकल्प सुरु केला आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला ते कळवा. त्याच प्रमाणे अधिक माहिती असल्यास सर्वांसोबत वाटा.

- तर्फ़े तंत्रज्ञान (अक्षय)

क.लो.अ.


Tagged: मोफ़त, marathi, technology, wiki, wikipedia




Latest Images